Rinku rajguru and Vishal Anand Team lokshahi
मनोरंजन

रिंकू राजगुरुचा 'आठवा रंग प्रेमाचा' या नव्या चित्रपटाचे पोस्टर पाहिलंत का?

रिंकू राजगुरुचा चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Published by : Team Lokshahi

सैराट(Sairat) या चित्रपटात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता सर्वांची लाडकी आर्ची नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) या नव्या चित्रपटाचे पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले आहे. सध्या सर्वत्र या पोस्टरची चर्चा रंगली आहे. रिंकू राजगुरुच्या या नव्या चित्रपटाचे नाव “आठवा रंग प्रेमाचा” असे आहे. हा चित्रपट १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरु आणि विशाल आनंद(Vishal Anand) ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आदिनाथ पिक्चर्स, राकेश राऊत (Rakesh Raut) प्रॉडक्शन्स आणि टॉप अँगल प्रोडक्शननं ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा (Khushboo Sinhha) यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

रिंकूने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये रिंकू राजगुरु आणि विशाल आनंद हे दोघेही दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना रिंकूने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. ‘सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरु, ‘आठवा रंग प्रेमाचा’ १७ जून पासून चित्रपटगृहात…’, असे रिंकूने यावेळी म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा