मनोरंजन

अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चा टीझर पाहिलात का?

Published by : Lokshahi News

अक्षय कुमारचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ अनेक चित्रपटांची घोषणा करत आहे. 

सूर्यवंशी', 'अतरंगी रे', 'बच्चन पांडे' यानंतर आता अक्षय कुमारने त्याच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षय कुमार लवकरच अभिनेता टायगर श्रॉफसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा 'बडे मियाँ'ची भूमिका साकारत आहे. तर टायगर श्रॉफ हा 'छोटे मियाँ'ची भूमिका साकारत आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. अमिताभ बच्चन आणि गोविंदाचा यांचा लोकप्रिय चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ (१९९८)' चा टायटल ट्रॅकही पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर तर पूजा एन्टरटेन्मेंट आणि वाशू भगनानी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर