Hawa Hawai Marathi Movie  Team Lokshahi
मनोरंजन

दमदार कलाकारांची "हवाहवाई"मध्ये फौज!!

"द ग्रेट इंडियन किचन" या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा संजयनचं मराठीत पदार्पण होणारा चित्रपट म्हणून 'हवाहवाई'ची जोरदार चर्चा आहे.

Published by : Team Lokshahi

"द ग्रेट इंडियन किचन" या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा संजयनचं मराठीत पदार्पण होणारा चित्रपट म्हणून 'हवाहवाई' ( Hawa Hawai ) ची जोरदार चर्चा आहे. निमिषासह वर्षा उसगावकर, (Varsha Usgaonkar ) सिद्धार्थ जाधव, (Siddhartha Jadhav ) समीर चौघुले (Samir Choughule ) अशा दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात असून, "हवाहवाई" ( Hawa Hawai ) हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मुंबईतील फूड स्टॉल चालविणाऱ्या महिलांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे लाँच करण्यात आले.

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर ( Mahesh Tilekar ) आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी "हवाहवाई" चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. महेश टिळेकर यांनी आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम कौटुंबिक चित्रपट केले असल्याने "हवाहवाई" त्याच मांदियाळीतला आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 88 व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं हवाहवाईमध्ये गायलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या ठसकेबाज आवाजातही एक उत्तम गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून चित्रपटातील गीते महेश टिळेकर यांनी लिहिली आहेत.कला दिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता म्हणून अभिजित अभिनकर यांनी काम पाहिले असून नृत्य दिग्दर्शन सॅन्डी संदेश यांचे आहे.

मल्याळम चित्रपटांमध्ये निमिषा संजयननं सशक्त अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली आहे. आता हवाहवाई या चित्रपटाद्वारे ती मराठी चित्रपटांत दाखल होत आहे. तिच्यासह अभिनेत्री वर्षा उसगावकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन या कलाकारांनी विविध भूमिका हवाहवाई चित्रपटात साकारल्या आहेत. अतिशय फ्रेश लुक असलेल्या पोस्टर आणि मातब्बर कलाकार यामुळे आता "हवाहवाई" चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनांची नक्कीच पर्वणी ठरेल यात शंका नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप