मनोरंजन

Helmet 2021|’कंडोमचे’ महत्व सांगणार हेल्मेट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : Lokshahi News

हेल्मेट हा आगामी हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अपरशक्ती खुराना, प्रनूतन बहल, अभिषेक बॅनर्जी आणि आशिष वर्मा मुख्य पात्र म्हणून दिसणार आहेत. सतराम रमणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटामध्ये सेक्स, कंडोम यांन सारखे विषय अतिशय नाजूक पद्धतीने हाताळले आहेत. दिग्दर्शक या चित्रपटामधून कॉमेडीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करताना आपल्याला दिसतो. अगदी हलक्याफुलक्या डायलॉगच्या माध्यमातून या चित्रपटाचा ट्रेलर आपले लक्ष वेधून घेतो.

या चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रनूतन बहल ही अपरशक्ती खुराना सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. समाजात कंडोम खरेदी करण्यासाठी लोकांचा विरोध दर्शविला जातो. एखाद्याने ते खरेदी केल्यास त्यास लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. हया गोष्टी अतिशय गमतीशीर आणि मनोरंजक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट 3 सप्टेंबर २०२१ रोजी झी फाईव्ह (zee5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...