हेमांगी कवी Hemangi Kavi 
मनोरंजन

' जमलं तर माफ करा बाबासाहेब!', पोस्ट शेअर करत म्हणाली हेमांगी कवी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हिमांगीने एक पोस्ट शेअर केली आहे.

Published by : Rajshree Shilare

अभिनेत्री हेमांगी कवी ( Hemangi Kavi) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सोशल मीडियाद्वारे देशातील विविध विषयांवर व्यक्त होत असते. हेमांगी कवी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत निर्भीडपणे व्यक्त करते. नुकताच तिने तिच्या सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

आज देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedakar Jayanti) यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. जगभरातून आज बाबासाहेबांना अभिवादन केले जाते आहे. अशात हेमांगी कवीनं थोड्या वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं तिच्या फेसबुक पेजवर आंबेडकर जयंतीनिमित्त एक पोस्ट करताना लिहिलं,'मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!'

हिमांगी कवीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिला जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या तर काहींनी ट्रोलदेखील केले. मात्र हिमांगीनं साडेतोड उत्तर दिले. अनेकांनी तिच्या विचारांचे कौतुक केले आहे. बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी हेमांगीची पोस्ट महत्वाची आहे असे अनेक चाहत्यांनी म्हंटले आहे. हेमांगी लवकरच ‘भारत माझा देश आहे’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच सध्या ती ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा