Monsoon  Team Lokshahi
मनोरंजन

Monsoon : 'ही' आहेत काही रम्य ठिकाणे...

रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा आराम मिळण्यासाठी, बाहेरील जगाचा आनंद घेण्यासाठी बरीच मंडळी पावसाला सुरू झाला की, फिरण्यासाठी घराबाहेर पडत असतात.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रासह मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाला (Monsoon) सुरूवात झाली की, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, घाटांवर मोहक हिरवळ, चित्तथरारक धबधबे आणि आल्हादायक हवामान या सगळ्यांमुळे वातावरण (Environment) प्रसन्न होते.

रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा आराम मिळण्यासाठी, बाहेरील जगाचा आनंद घेण्यासाठी बरीच मंडळी पावसाला सुरू झाला की, फिरण्यासाठी घराबाहेर पडत असतात. अशातच काही रम्य आणि भरपूर हिरवाईने नटलेली ठिकाणे भारतभर आहेत.

Lonavala

लोणावळा : मुंबईपासून 83.6 किमी असलेला लोणवळा (Lonaval) अतिशय दाटीवाटीच्या हिरवळीने भरलेला आहे. अनेक मंडळी पावसाळ्यात लोणावळ्याला भेट देण्यासाठी जात असतात. लोणावळ्यामधील स्थित असलेल्या टायगर पॉइंट नावाच्या उंच शिखरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या विस्तृत दृश्याला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी नेहमीच होत असते.

तसेच इ.स. सन दुसऱ्या ते तिसऱ्या शतकाच्या आसपास बौध्द भिक्खूंनी बांधलेल्या कार्ला गुहांचा शांततेचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमीच जात असतात. बुशी धरणाजवळील धबधबा हा मान्सून प्रेमींसाठी अत्यंत प्रसिध्द आहे.

Goa

गोवाः गोवा हे भारतातील पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाणांपैकीचे एक ठिकाण आहे. सर्वांनाच आवडेल असा भल्लामोठा समुद्रकिनारा गोवा या शहराला लाभलेला आहे. वाळू , रिमझीम आणि नयनरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात समुद्रकिनारा नेहमीच एक चांगला पर्याय ठरतो.

गोव्यामधील (Goa) दूधसागर धबधब्यावर ट्रेकिंग किंवा हायकींगला ही नेहमीच चांगली पसंती दाखवली जाते. तसेच अगुआडा किल्ला, डॉलफिन शो असे अनेक ठिकाणे प्रसिध्द आहेत.

Andaman Nicobar

अंदमान आणि निकोबार बेट : 570 बेटांचा समूह, तसेच अदभुत वन्यजीवन, दमनमधील थरारक जलक्रीडे , पर्वत, चित्तथरारक नैसर्गिक सौंदर्य अश्या अनेक कारणांनी अंदमान आणि निकोबार बेट (Andaman Nicobar) हे प्रसिध्द आहे. सेल्युलर जेल , हॅवलॉक बेटावर स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि इतर जलक्रीडा आणि लहान अंदमान येथे सर्फिंगसाठी बऱ्याचदा पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. असंख्य पर्वतीय मार्गांसह, बर्फाच्छादित बलाढ्य पर्वतांनी वेढलेले क्रिस्टल स्वच्छ पाण्यासह चमकदार तलाव हे येथील वैशिष्टय आहे.

Ladakh Festival

लडाख : जम्मू आणि काश्मिर दरवर्षी सप्टेंबर या कालावधीत जम्मू आणि काश्मिरमध्ये लडाख महोत्सव (Ladakh Festival) साजरा केला जातो, भारतामधील हे थंड वाळवंट अनेक प्रवाशांच्या मनपसंतीचे ठिकाण आहे. लडाख फेस्टिव्हल टूर, तिबेटी भाषेतील लांब, अरुंद, मंत्रमुग्ध तलावाचा अर्थ असलेल्या पॅंगॉन्ग तलावाभोवती फेरफटका मारणे, चा्गंला खिंडीत बर्फाशी खेळणे आणि थिकसे मठात आशीर्वाद घेणे हे येथील काही प्रसिध्द ठिकाणे आहेत.

Udaipur

उदयपूर- राजस्थान : असंख्य राजवाडे आणि बाजार आणि सुंदर तलावांसह हे ठिकाण खरोखरच महाराजांच्या गौरवशाली भूतकाळाचे प्रतिबिंबित दर्शविते. पावसाळ्यात ह्या ठिकाण अतिशय थरारक दृश्य पाहायला मिळतात. सिटी पॅलेस, मान्सून पॅलेस, लेक पॅलेस येथील राजेशाही अनुभव आणि भारतीय राजे आणि महाराजांचा गौरवशाली भूतकाळ जाणून घेण्यासाठी पर्यटक नेहमी गर्दी करत असतात. तसेच फतेह सागर तलावाच्या मोहक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी बरीच मंडळी या ठिकाणी भेट देत असतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?