Raha Kapoor  Team Lokshahi
मनोरंजन

हे आहे आलिया आणि रणबीरच्या मुलीचे नाव: पहा नावाचा अद्भूत अर्थ

अखेर काल आलिया ने तिच्या बाळाच्या नावाचा खुलासा केला.या नावाचे बरचे अद्भुत आणि सुंदर अर्थ होतात.

Published by : Team Lokshahi

थोड्याच दिवसापूर्वी आलिया आणि रणबीरने आपल्या बाळाच्या आगमनाची गोड बातमी दिली, त्यामुळे सगळीकडेच आलिया आणि रणबीरच्या बाळाची चर्चा होती. इंस्टाग्राम वर पोस्ट टाकून आलियाने बाळाच्या आगमनाची बातमी जाहीर केली. आणि अखेर काल आलिया ने तिच्या बाळाच्या नावाचा खुलासा केला, बाळाचे नाव 'राहा' असल्याचे त्यांनी चाह्त्यांना इंस्टाग्राम पोस्टमार्फत सांगितले. 'राहा' या नावाचे बरचे अद्भुत आणि सुंदर अर्थ होतात.

"'राहा' हे नाव तिच्या आजीने ठेवले आहे. राहा नावाचा शब्दशः अर्थ म्हणजे दैवी मार्ग, स्वाहिलीमध्ये नावाचा अर्थ आनंद असा होतो, आणि संस्कृतमध्ये राहा हे कुळ आहे, तर बांगलामध्ये - विश्रांती, आराम असा होतो, अरबमध्ये शांतता, त्याचबरोबर नावाचा अर्थ आनंद, स्वातंत्र्य असाही होतो.तिच्या येण्याने आमच्या कुटुंबात जिवंतपणा आलं आणि असे वाटते की आमचे आयुष्य आताच सुरू झाले आहे. ☀️☀️☀️" अश्या शब्दात आलिअने तिच्या मुलीप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या. त्या फोटोमध्ये आलिया आणि रणबीरने राहाला कुशीत घेतले आहे, आणि मागे ब्लाक जर्सी वर राहा हे नाव आधीच छापलेले दिसत आहे. आणि जर्सी वर फोकस केला आहे. आलिया आणि रणबीरने 6 नोव्हेंबर रोजी राहाचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले. मुलीच्या आगमनाची घोषणा करताना, आलियाने एका Instagram पोस्टद्वारे लिहिले, "आणि आमच्या आयुष्यातील सर्वात सुखद बातमी म्हणजे बाळाच्या आगमनाची बातमी आहे... आणि ती खूप मॅजिकल गर्ल आहे असेही त्यांनी सांगितले. आम्ही तिच्या येण्याने धन्य झालो, आमचे कुटुंब संपन्न झाले." याआधी आलिया तिच्या प्रेग्नन्सी दरम्यान चाहत्यांवर आपल्या सुंदर प्रेग्नसी शूट च्या फोटोज चा वर्षाव करत होती.

दोघांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर 14 एप्रिल 2022 रोजी आपली लग्नगाठ बांधली. लग्नाआधी हे स्टार कपल 5 वर्षांपासून डेट करत होते. त्यांची लव्हस्टोरी अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रच्या सेटवर सुरू झाली, हा त्यांचा एकत्र काम करतानाचा पहिला चित्रपट होता.आलिया भट्ट लवकरच 'हार्ट ऑफ स्टोन' मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, ज्यात तिची सह-कलाकार गॅल गॅडोट आहे. याशिवाय, आलियाकडे आजूनही अनेक चित्रपट आहेत. आलिया भट्टचे या वर्षी चार चित्रपट रिलीज झाले - RRR, गंगुबाई काठियावाडी आणि ब्रह्मास्त्र - या सर्वांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. तिने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या डार्लिंग्समध्ये देखील उत्तम काम केले आणि त्याचबरोबर सह-निर्मिती सुद्धा केली. आता रोहाच्या मुखदर्शनाची चाहते वाट बघत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?