अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ती 'काटा लगा' या गाण्याने प्रसिद्ध झाली होती. मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणारी अभिनेत्री शेफाली रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गंभीर आजारी पडली. छातीत दुखू लागल्याने, तिचा पती पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला, जिथे तिला पोहोचताच मृत घोषित करण्यात आले. सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
यादरम्यान रिॲलिटी शो बिग बॉस 13 मधील हिमांशी खुराणा हिने शेफालीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलं आहे. ज्यात तिनी थक्क कारणारं विधान केलं आहे. तिनी या स्टोरीद्वारे असं म्हटलं आहे की,"बिग बॉस, मला वाटतं ती जागा शापित आहे". याचा सहसंबंध बिग बॉस 13 चे स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला यांच्या आणि सोनाली फोगाट यांच्या मृत्युसोबत जोडल्याचं पाहायला मिळालं आहे.
हिमांशी खुराणा, शेफाली जरीवाला आणि सिद्धार्थ शुक्ला हे तिघे बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये एकत्र होते. त्यानंतर बीग बॉसमधून बाहेर पडताच 2021 रोजी सिद्धार्थ शुक्ला यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. त्यानंतर बिग बॉस सीझन 14 मध्ये सोनाली फोगाटने भाग घेतला आणि 2022 मध्ये तिचाही मृत्यु झाला. त्यानंतर आता 2025मध्ये शेफाली जरीवाला हिचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे हिमांशी खुराणाने केलेलं हे वक्तव्य लक्षवेधी ठरलं आहे.
शेफालीच्या मृत्यूचं आणखी काही कारण?
डॉक्टरांनी ही सुद्धा माहिती दिली आहे् की, अभिनेत्री वयाने लहान दिसण्यासाठी गोळ्या औषध घेत होती. त्यासाठी ती दोन गोळ्या घेत होती. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन नावाची औषधे खात होती. परंतू या गोळ्याच्या संबध ह्रदयाशी नाही. त्याफक्त संबंध त्वचा उजळण्यासाठी केला जातो.