मनोरंजन

Housefull 5 Release Date: प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय हाऊसफुल-5; 'या' दिवशी होणार रिलीज

Housefull-5 : अभिनेता अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

Akshay Kumar (Housefull-5) : अभिनेता अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती समोर आली आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही प्रतिक्षा करावी लागणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून आता अक्षय कुमारने या सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.

'हाऊसफुल 5' हा सिनेमा 2024 मध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा प्लॅन होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता अक्षय कुमारने या सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. 2025 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. त्यामुळे 'हाऊसफुल'च्या चाहत्यांना आणखी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

'हाऊसफुल 5' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. खिलाडीने आता सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. सिनेमाचं पोस्टर शेअर करत निर्माते साजिद नाडियाडवाला यांचं एक स्टेटमेंटदेखील जाहीर केलं आहे. यात लिहिलेलं आहे,"हाऊसफुल फ्रेंचायझीचं यश प्रेक्षकांना माहिती आहे. आता 'हाऊसफुल 5'ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा करतो.

अक्षय कुमारने पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"पाचव्यांदा मनोरंजनाचा धमाका करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 6 जून 2023 ला सिनेमागृहात भेटू". 'हाऊसफुल 5' या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहे. तरुण मनसुखानी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'हाऊसफुल 5' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या सिनेमासंदर्भातील प्रत्येक अपडेट ते जाणून घेत आहेत.

दरम्यान, 2010 साली प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका घातला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर 2012 मध्ये 'हाऊसफुल 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर 2016 मध्ये 'हाऊसफुल 3' आणि 2019 मध्ये 'हाऊसफुल्ल 4' हे सिनेमाही प्रदर्शित झाला. त्यानंतर आता 'हाऊसफुल 5' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र 6 जून 2025 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा