मनोरंजन

ऋतिक, दीपिकाचा आगामी चित्रपट फायटर या तारखेला होणार रिलीज

Published by : Team Lokshahi

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बॉलीवूडचे (Bollywood) सुप्रसिद्ध स्टार आहेत. त्यांच्या चाहत्यांची दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा होती आणि अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. दोघांचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे आणि त्यांचे चाहते त्यांचे चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. चित्रपट "फाइटर" (Fighter) ची रिलीज तारीख समोर आली आहे. हा चित्रपट 28 सप्टेबर,2023 मध्ये रिलीज होणार आहे.

हृतिक रोशनने त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंन्टवर एक व्हिडिओ पोस्ट करून ही बातमी दिली आहे. व्हिडिओनुसार, 'फाइटर' हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन (Aerial Action) चित्रपट आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सोबतच या चित्रपटात अनिल कपूरही (Anil Kapoor) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद (Siddhartha Anand) यांनी दिग्दर्शित Directed केला आहे.

या चित्रपटात हृतिक रोशन भारतीय पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. एका मुलाखतीत सिद्धार्थ आनंदने दीपिकाच्या भूमिकेबद्दल सांगितले की, दीपिका या चित्रपटात हृतिकसोबत भरपूर अॅक्शन करताना दिसणार आहे. सोबतच दीपिका पदुकोणनेही तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंन्टवर या चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य