मनोरंजन

ऋता दुर्गुळेचा झाला साखरपुडा; VIDEO आला समोर

Published by : Lokshahi News

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि प्रियकर प्रतीक शाह यांचा साखरपुडा आज मोठ्या थाटात पार पडला आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या क्यूट कपलवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ऋता गेल्या काही दिवसांपासून प्रतीकसोबतचे फोटो पोस्ट करत आहे. आता या दोघांनी साखरपुडा करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. एका पोर्टलने देखील यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ऋता दुर्गुळेने यावेळी जांभळ्या रंगाच्या वनपिस घातला आहे. तर यालाच मॅच होणार सूट प्रतिकने घातला आहे. यांची जोडी खूपच छान दिसत आहे.

प्रतीक आणि ऋता सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीकने केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा