मनोरंजन

“मला गोमांस खायला आवडतं”;रणबीर कपूरचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत

अभिनेता रणबीर कपूर नेहमी वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असतो. रणबीरचा ९ सप्टेंबरला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड सुरू झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता रणबीर कपूर नेहमी वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असतो. रणबीरचा ९ सप्टेंबरला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड सुरू झाला आहे. आमिर खान आणि अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारचे चित्रपट लोकांनी बॉयकॉट केले. आता नेटकरी येणाऱ्या इतरही मोठ्या स्टार्सच्या आणि स्टारकिड्सच्या चित्रपटांना बॉयकॉट करताना दिसत आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’, हृतिक रोशनचा ‘विक्रम वेधा’, सलमान खानचा ‘टायगर ३’ या चित्रपटांना बॉयकॉट करण्याची मागणी सुरु आहेत.

यातच आता रणबीर कपूर एका वेगळ्या कारणानं चर्चेत आला आहे. कारण की, रणबीर कपूरचं जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.‘रॉकस्टार’ या रणबीर कपूरच्या चित्रपटाच्या प्रमोशमवेळी खाण्यावर आपलं किती प्रेम आहे? हे रणबीर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगत होता. पण त्याचबरोबरीने तो म्हणाला, “मला गोमांस खायला आवडतं.” असे त्यानं म्हटले होते.

त्यामुळे आता या वक्तव्यावर सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘ब्रम्हास्त्र’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन असे कलाकार दिसणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार