मनोरंजन

इम्रान हाश्‍मीचा नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Published by : Lokshahi News

बॉलीवूड अभिनेता इम्रान हाश्मी त्याच्या आवडत्या शैलीत परत येण्याचे चिन्ह आहे. इम्रान हाश्‍मीचा बहुप्रतीक्षित रहस्यमय-थरारपट 'डिबक – द कर्स इज रियल' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात निकिता दत्ता आणि मानव कौल यांच्यासोबत मुख्य भूमिकेत चित्रपटाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

या चित्रपटातून इम्रान हाश्‍मी वेगळ्या भूमिकेत दिसणार असून, सोबत निकिता दत्ता आणि मानव कौल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मॉरिशसच्या निसर्गरम्य पार्श्‍वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटात शापित बेटावर घडणारे भयंकर प्रसंग पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जय के. यांनी केले असून, तो सुपरहिट मल्याळम 'एझ्रा'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका जोडप्यातील पत्नी प्राचीन ज्युईश बॉक्‍स समजून डिबक बॉक्‍स घरी घेऊन आल्यानंतर उद्‌भवणारे प्रसंग दाखवण्यात आले आहेत.

चित्रपटाबाबत इम्रान हाश्‍मी म्हणाला, 'डिबक' हा माझा पहिला डिजिटल चित्रपट आहे आणि माझ्या आवडत्या प्रकारच्या भूमिकेसह स्ट्रीमिंग पार्टनर म्हणून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर या प्रवासाची सुरुवात करत असल्याचा आनंद आहे. हा चित्रपट अतिशय विचारपूर्वक, काही घाबरवणारे प्रसंग समाविष्ट करत उत्तम कथानकासह तयार करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा