Admin
मनोरंजन

बॉलिवूडमधल्या सर्व कलाकारांनी तिरंगा फडकावत देशवासियांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

बॉलीवूड इंडस्ट्री प्रत्येक गोष्टीत उत्साहाने भाग घेते. आज स्वातंत्र्यदिन आहे. या खास प्रसंगी संपूर्ण बॉलिवूड स्वातंत्र्याच्या जल्लोषात मग्न झाले आहे. या खास प्रसंगी अनेक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्स प्रत्येक देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबतच ध्वज फडकवून तिरंग्याची शान वाढवत आहेत. मनोरंजन विश्वातील हे कलाकार तिरंग्याला सलाम करत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलीवूड इंडस्ट्री प्रत्येक गोष्टीत उत्साहाने भाग घेते. आज स्वातंत्र्यदिन आहे. या खास प्रसंगी संपूर्ण बॉलिवूड स्वातंत्र्याच्या जल्लोषात मग्न झाले आहे. या खास प्रसंगी अनेक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्स प्रत्येक देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबतच ध्वज फडकवून तिरंग्याची शान वाढवत आहेत. मनोरंजन विश्वातील हे कलाकार तिरंग्याला सलाम करत आहेत.

सलमान खानने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर झेंडा फडकावत एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच प्रत्येक देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कार्तिक आर्यननेही घराच्या बाल्कनीतून दोन्ही हात जोडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या बाल्कनीच्या रेलिंगवरही तिरंगा दिसतो.

सारा अली खाननेही इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून संपूर्ण देशवासियांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आई अमृता सिंगसोबतचा एक फोटो शेअर केला असून त्यावर 'जय हिंद' असा हॅशटॅग लिहिला आहे.

स्वातंत्र्याच्या या खास प्रसंगी उर्वशी रौतेला संपूर्ण देशाला सलाम करताना दिसली.

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासह तिरंगा फडकवताना दिसला. शाहरुख, गौरी आर्यन आणि धाकटा मुलगा अबराम यांनी तिरंग्यासमोर पोज देत लोकांना शुभेच्छा दिल्या.

अनुपम खेर यांनीही ध्वजारोहण करतानाचा त्यांचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी ट्विट करून तमाम देशवासियांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजय देवगणनेही त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर करून वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Neeraj Chopra : जागतिक स्पर्धेत नीरज आठव्या स्थानी; तर सचिन यादवची लक्षवेधी कामगिरी

Uttarakhand landslide : उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू; सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Maharashtra Police : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ, एक पोलीस अंमलदार' योजना

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'