मनोरंजन

आमिर खानची लाडकी इरा बनली मिसेस शिखरे; लग्नामधील फोटो समोर

आमिर खानची मुलगी इरा खान नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. या सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांनी हजेरी लावली होती.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Ira-Nupur wedding Photo: आमिर खानची मुलगी इरा खान नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. या सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

इरा आणि नुपूरचे लग्न अगदी अनोखे होते. जॉगिंग करत नुपूरने लग्नाची वरात आणली. तो 8 किलोमीटर धावला. त्याने शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातला होता. इरानेही तिचा ब्राइडल लुक खास ठेवला होता. तिने लेहेंगा आणि साडी टाळत हेरम पँट घातली होती आणि दोन दुपट्टे वेअर केले होते. ३ जानेवारीला इरा आणि नुपूरने कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर नुपूरने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती.

इरा खान आणि नुपूर शिखरे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. 2022 मध्ये त्याने आयराला लग्नासाठी प्रपोज केले होते. इरा आणि नुपूर यांची नोव्हेंबर 2022 मध्ये एंगेजमेंट झाली. कोर्ट मॅरेजनंतर आता इरा आणि नुपूर उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. याचे विधी 8 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. वृत्तानुसार, 13 जानेवारीला मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन दिले जाणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा