Tiger Shroff , Disha Patani Team Lokshahi
मनोरंजन

दिशा आणि टायगरच्या नात्यात 'लग्न' ठरला अडथळा? मित्राने सांगितले जोडप्याच्या नात्याचे सत्य

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी सध्या तिच्या आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, याशिवाय एक कारण आहे, ज्यामुळे दिशा चर्चेत आहे.

Published by : shweta walge

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी (Disha Patani) सध्या तिच्या आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, याशिवाय एक कारण आहे, ज्यामुळे दिशा चर्चेत आहे. कारण आहे दिशा पटानी आणि टायगर श्रॉफचे (Tiger Shroff) ब्रेकअप. बातमीनुसार, दिशा आणि टायगरचे ब्रेकअप झाले आहे, याविषयी ना अभिनेत्रीने कोणतेही वक्तव्य दिलेले आहे ना टायगरच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आली आहे. मात्र त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांची मनं तुटली आहेत.

दिशा आणि टायगर याविषयी बोलले नाहीत, मात्र या जोडप्याच्या एका मित्राने त्यांच्या ब्रेकअपचे कारण नक्कीच सांगितले आहे. ETimes शी बोलताना एका मित्राने सांगितले, 'दिशा आणि टायगर जवळजवळ तेव्हापासूनच एकत्र राहत होते, जेव्हापासून टायगर त्याच्या कुटुंबापासून वेगळे राहू लागला होता'.

"दोघेही बराच काळ एकत्र राहत होते, त्यामुळे दिशाला याच वर्षी लग्न करायचे होते. याबाबत दिशा टायगरशी बोलली पण टायगरने तसे करण्यास नकार दिला. याबाबत दिशा टायगरशी एकदा नाही तर अनेक वेळा बोलली, पण अभिनेता प्रत्येक वेळी 'नाही, आता नाही' असे म्हणाला. दिशाला टायगरशी लग्न करायचे होते, पण टायगर अजून लग्नाला तयार नव्हता.

काय म्हणाले जॅकी श्रॉफ?

टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपच्या बातम्यादरम्यान जॅकी श्रॉफचे हे वक्तव्य समोर आले आहे. बॉम्बे टाईम्सशी संवाद साधताना जॅकी म्हणाला, 'ते नेहमीच मित्र होते आणि अजूनही मित्र आहेत. मी दोघांना एकत्र बाहेर जाताना पाहिले आहे. मी माझ्या मुलाच्या प्रेम जीवनाचा ट्रैक घेऊ शकत नाही. पण मला वाटते की ते जवळचे मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकत्र वेळ घालवतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा