मनोरंजन

सोनू निगम वडापाव खातोय की गातोय? लवकरच वडापाव चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलीवूडचा प्रथितयश गायक सोनू निगम एक अनोखे खुमासदार गीत घेऊन येत आहे, प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपटातील हे गीत आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलीवूडचा प्रथितयश गायक सोनू निगम एक अनोखे खुमासदार गीत घेऊन येत आहे, प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपटातील हे गीत आहे. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला 'वडापाव' हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचं नाव 'वडापाव' असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' चित्रपटात सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रसाद ओकच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना कुटुंब आणि त्यातील नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला. त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी 'वडापाव' चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

प्रसाद ओकने 'वडापाव' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सोनू निगम वडापाव खाताना दिसत आहे. तसेच या पोस्टरवर लिहिलेलं आहे की,"सोनू निगम वडापाव खातोय की वडापाव गातोय? प्रसाद ओकची रुचकर पाककृती". पोस्टर शेअर करत प्रसादने लिहिलं आहे,"सोनूजींनी वडापाववर मारला ताव..वडापावसाठी गाताना...लवकरच आम्ही घेऊन येत आहोत एक गोड गाणं सोनूजींच्या मखमली आवाजात..आमचा आगामी सिनेमा 'वडापाव".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा