Jackie Shroff
Jackie Shroff Team Lokshahi
मनोरंजन

टायगर- दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी या जोडीची बॉलीवूडच्या अशा जोडप्यांमध्ये केली जाते जे कधीही त्यांच्या प्रेमावर उघडपणे बोलले नाही. मात्र सर्वांनाच असे वाटते की, ते एकमेकांना डेट करत आहेत. टायगर आणि दिशा सहा वर्षापासून एकमेकांनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

अनेकदा टायगर आणि दिशाला एकत्र स्पॉट केले गेले आहे. तरीही साऱ्यांनाच ते डेट करत असल्याचं माहीत होतं किंवा किमान तसं वाटत होतं. दोघांनी याबद्दल कोणतंही भाष्य केलं नसलं तरी गेल्या सहा वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. सध्या त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडयावर सुरू आहेत. यावर आता टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जॅकी श्रॉफ यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते. आताही ते चांगले मित्र आहेत. मी त्यांना नेहमीच एकत्र एन्जॉय करताना आणि टाइम स्पेंड करताना पाहतो. मी माझ्या मुलाच्या लव्ह लाइफमध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब करणं मला आवडत नाही. ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहे. कामाव्यतिरिक्तही ते एकमेकांसाठी वेळ काढतात. फिरायला जातात.” यासोबतच ते म्हणाले की, “हे त्यांचं खासगी आयुष्य आहे आणि त्यातील निर्णय ते दोघंही स्वतः घेऊ शकतात. त्यांना एकत्र राहायचं आहे की नाही हे त्यांना ठरवायचं आहे. ते एकमेकांसाठी योग्य आहेत किंवा नाही हे देखील त्यांनाच ठरवायचं आहे. ही त्यांची लव्हस्टोरी आहे. मी आणि माझ्या पत्नीची वेगळी लव्हस्टोरी आहे. आमचं दिशासोबत चांगलं बॉन्डिंग आहे. आम्ही एकमेकांना भेटून आनंदी असतो.”

मिळालेल्या माहितीनुसार टायगर आणि दिशा यांचा ब्रेकअप झालं असून मागच्या वर्षभरापासून दोघांमध्ये वाद सुरू होते. दरम्यान दिशा पाटनी किंवा टायगर श्रॉफनं या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मतदानाच्या हक्क बजावल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Cm Eknath Shinde : बोगस मतदान आणण्याची आम्हाला आवश्यकता काय आहे? आज संपूर्ण मतदार जो आहे महायुतीच्या प्रेमात आहे

आमदार गणेश नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : निस्वार्थी भावनेनं लोकांची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आलेलो आहोत, या निस्वार्थी भावनेनं पुढेही सेवा करण्यासाठी मी खासदार होणारच

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...