Jackie Shroff Team Lokshahi
मनोरंजन

Jackie Shroff : टायगर अन दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफने केलं वक्तव्य...

जॅकीने सांगितले की हे त्यांचे वयक्तिक आयुष्य आहे आणि पुढे कसे जगायचे हा त्यांचा निर्णय आहे.

Published by : prashantpawar1

टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पाटणी (Disha Patani) यांच्या ब्रेकअप बद्दल पसरलेल्या बातम्यांवर जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांचे वक्तव्य समोर आले आहे. दिशाबद्दल तो नेहमीच एका कुटुंबाप्रमाणे बोलत असतो. पत्रकारांशी संवाद साधताना जॅकी म्हणाला की, ते नेहमीच मित्र होते आणि आजही मित्र आहेत. मी दोघांना नेहमी एकत्र पाहिलेलं आहे. मी माझ्या मुलाच्या नात्यात दखलअंदाज करू शकत नाही. पण मला वाटते की ते दोघेही अगदी जवळचे मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते आपला वेळ एकत्र घालवतात.

टायगरसाठी हे त्याचं वयक्तिक आयुष्य आहे.

जॅकीने असेही सांगितले की, हे त्याचे वयक्तिक आयुष्य आहे आणि पुढं कसं जायचं हा त्यांचा निर्णय आहे. तो म्हणाला की त्यांना एकत्र रहायचं की नाही हे त्यांच्या हाती आहे. ते एकमेकांना पात्र आहेत की नाही हे मी नाही सांगू शकत. ही माझी आणि माझ्या पत्नी (आयशा) सोबतच्या प्रेमकहाणीसारखी त्यांची प्रेमकथा आहे. आम्ही दोघेही दिशासोबत चांगले जमलो आणि मी म्हटल्याप्रमाणे ते दोघे एकत्र आनंदी आहेत. ते भेटतात, बोलतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार टायगर श्रॉफच्या मित्राच्या हवाल्याने ब्रेकअपची बातमी खरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ब्रेकअपमुळे टायगरच्या कामावर काहीही परिणाम होऊ दिला नाही. सध्या तो पूर्वीप्रमाणेच तो त्याच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतोय. सध्या तो लंडनमध्ये त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर दिशा पटानी ही सध्या तिचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं सांगण्यात येतय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा