मनोरंजन

‘ईडीला उत्तर’न देता जॅकलीन पोहोचली ‘रामसेतू’च्या शूटिंगसाठी

Published by : Lokshahi News

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद असलेला सुकेश चंद्रशेखर द्वारे 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने समन्स पाठवले. नोराला समन्स जारी करून या प्रकरणी चौकशीत सहभागी होण्यास सांगण्यात आले होते, यानंतर नोरा आपला जबाब नोंदवण्यासाठी ईडी कार्यालयात पोहचली असून, सुकेश वर केवळ नोरा फतेहीच नव्हे, तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला फसवल्याचा सुद्धा आरोप आहे. नोरा फतेहीसह ईडीने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला सुद्धा पुन्हा समन्स पाठवले आहे, आज तिसऱ्या वेळी समन्स पाठवण्यात आला होता परंतु जॅकलिन उपस्थित राहिलीच नाही.

अभिनेत्री जैकलीन फर्नांडीस सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. खाजगी आयुष्याशी आणि चित्रपटाशी निगडित सर्व गोष्टी जॅकलिन सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांपर्यंत पोहचवत असतेच तसेच जॅकलीनने आगामी चित्रपट 'रामसेतू' चित्रपटाचे शूटिंग आजपासून सुरु केले आहे. त्या संबंधित जॅकलीनने इन्स्ट्राग्रामवरती फोटोज शेयर केले आहेत.

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये जॅकलीन स्पष्टपणे दिसून येत नाही पण अक्षय कुमार यांच्या सोबत निसर्गाचे सौंदर्य निहाळताना ती दीसत आहे. फोटो एका साईडने क्लिक केला आहे म्हणून या फोटोमध्ये अक्षय आणि जॅकलीन स्पष्ट दिसत नाही. फोटोमध्ये पाहिलं तर सगळीकडे हिरवळच दिसून येत आहे. 'माझ्या आवडीच्या उटी मधील 'रामसेतू' च्या सेटवर पुन्हा येऊन मला खूप आनंद होत आहे ! निसर्ग स्वतःमध्येच खूप सुंदर आहे '.असा कॅप्शन देऊन तिने हा फोटो अक्षय कुमारला टॅग केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा