Jacqueline Fernandez sonu sood Team Lokshahi
मनोरंजन

जॅकलिन फर्नांडिस व सोनू सूद पडद्यावर करणार रोमान्स; पहिल्यांदाच दिसणार एकत्र

2023 मध्येही जॅकलिन व सोनू सूद जबरदस्त लाइनअपसह चाहत्यांचे करणार मनोरंजन

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलीवूड दिवा जॅकलिन फर्नांडिसने अलीकडेच रिलीज झालेल्या 'सर्कस' चित्रपटातील तिच्या सुंदर रेट्रो लूकने सर्वांनाच भुरळ घातली आहे. तसेच, 2023 मध्येही जॅकलिन तिच्या जबरदस्त लाइनअपसह चाहत्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळणार आहे.

जॅकलिन लवकरच सोनू सूदसोबत आगामी चित्रपट 'फतेह'साठी हातमिळवणी करणार असून दोन्ही कलाकार पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'विक्रांत रोना' चित्रपटातील 'रा रा रक्कम्मा' या गाण्याने जॅकलिन फर्नांडिसला ब्लॉकबस्टर यश मिळवून दिले. तसेच, प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनी अभिनेत्रीच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुकदेखील केले. याशिवाय 'सर्कस' चित्रपटातील तिचा कधीही न पाहिलेला विंटेज लूकही सर्वांना आवडला आहे.

याशिवाय जॅकलिनच्या 'क्रॅक' चित्रपटाचीही नुकतीच घोषणा करण्यात आली असून ती हॉलिवूड प्रोजेक्ट 'टेल इट लाइक अ वुमन'मध्येही दिसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार