Jacqueline, Nora and other actresses are also involved in the Sukesh Chandrasekhar case 
मनोरंजन

Sukesh ChandraShekhar : सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन, नोरासह ‘या’ अभिनेत्रींचाही समावेश

Published by : Shweta Chavan-Zagade

मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे (money laundering case) चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) सोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव (Jacqueline Fernandez) जोडले जात  होते. त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. पण आता याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर (bhumi Pednekar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) सारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या होत्या.

सुकेश चंद्रशेखर या उद्योहपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश होता. ही सर्व माहिती ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली होती. पण आता जॅकलीनसह आणखी काही अभिनेत्रींनादेखील महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू