Janhvi Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Janhvi Kapoor : तिन्ही खानसोबत काम करण्यास जान्हवीने दिला नकार

'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतच तिन्ही खानसोबत काम करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नुकत्याच रिलीज झालेल्या 'गुडलक जेरी'साठी प्रेक्षाकांकडून तिला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. अभिनयासोबतच ती मनमोकळेपणाने बोलण्यासाठीही नेहमी ओळखली जाते. 2018 साली 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतच तिन्ही खानसोबत काम करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाली जान्हवी कपूर ?

एका मुलाखतीदरम्यान तिला जेव्हा विचारण्यात आलं की तिला बॉलिवूडच्या तिन्ही खानसोबत काम करायला आवडेल का? यावर जान्हवीने मजेशीर उत्तर दिले आहे. या तिन्ही सुपरस्टार्ससोबतची जोडी मोठ्या पडद्यावर विचित्र दिसेल असं अभिनेत्रीने सांगितलं. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली की तो सर्वात मोठे स्टार आहेत आणि प्रत्येकाला त्यांच्यासोबत काम करायचे आहे. पण त्याच्या विरुद्ध काम केल्यास मला थोडे विचित्र वाटेल.' मात्र, तिघासोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले. जान्हवी सध्या 25 वर्षांची आहे तर तिन्ही खान 50 वर्षांची आहेत.

या स्टार्ससोबत काम करण्याची इच्छा आहे

वरुण धवन, रणबीर कपूर यांसारख्या स्टार्ससोबत ती मोठ्या पडद्यावर चांगली दिसेल असं अभिनेत्रीने सांगितलं. याशिवाय तिने आलिया भट्ट हिचं देखील जोरदार कौतुक केलं. जान्हवीने सांगितले की आलियाने तिला खूप प्रेरित केलेलं आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार जान्हवी
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतच तिचा 'गुड लग जेरी' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय ती 'बावल' चित्रपटातही दिसणार आहे. 'दंगल' आणि 'छिछोरे' सारख्या ब्लॉकबस्टर्ससाठी ओळखले जाणारे नितेश तिवारी(Nitesh Tiwari) या चित्रपटाचे दिग्दर्शन करनार आहेत. याशिवाय मिस्टर अँड मिसेस माही, तख्त आणि मिली या चित्रपटातही ती तिच्या अभिनयाची ताकद दाखवणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा