Janhvi Kapoor, Tejasswi Prakash  Team Lokshahi
मनोरंजन

Janhvi Kapoorने Recreate केला तेजस्वी प्रकाशचा डायलॉग, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिचा 'गुड लक जेरी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिचा 'गुड लक जेरी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यातच जान्हवीने कपूरने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मध्यरात्री मिठाई खाताना दिसत आहे.

शेअर केलेल्य़ा व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर मध्यरात्री मिठाई खाण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यातच अचानक तिची मैत्रीन खोलीत येते आणि विचारते तू रात्री 'वॉक' करत आहेस. यावर जान्हवी म्हणते- जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्हाला वेळ दिसत नाही. आणि वेळ पाहून कधीही चालत नाही. कारण कोणी आमच्याकडे पाहिलं तर ते माझ्या फिगरला पाहत. त्यामुळे मी माझी फिगर सांभाळते. म्हणूनच मी चालते. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवीने तेजस्वी प्रकाशचा नागिन या शो मधला डायलॉग Recreate केला आहे.

जान्हवी कपूर सध्या 'गुड लक जेरी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती ड्रग्जची तस्करी करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच आला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. जान्हवीच्या करिअरमधील हा एक मोठा चित्रपट ठरेल, असे मानले जात आहे. 'गुड लक जेरी' हा 2018 च्या तमिळ चित्रपट कोलामावू कोकिलाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा