मनोरंजन

अ‍ॅक्शन फिल्म्स कोणीच ऑफर केले नाही; शाहरुख खानने व्यक्त केली मनातील खदखद

बॉलिवूड किंग शाहरुख खानने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जलवा दाखवला आहे. या चित्रपटात किंग खान धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड किंग शाहरुख खानने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जलवा दाखवला आहे. शाहरुखचा बहुप्रतिक्षित 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात किंग खान धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. 'जवान'पूर्वी किंग खान 'पठाण'मध्ये अ‍ॅक्शन करताना दिसला होता. शाहरुखने आपल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळच्या कारकिर्दीत या दोन चित्रपटांपूर्वी कधीही अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट केले नाही. अनेक वर्षांनंतर शाहरुखने अ‍ॅक्शन चित्रपट का केले नाहीत याचा खुलासा केला.

एका मुलाखतीदरम्यान शाहरुख म्हणाला की, मला अ‍ॅक्शन करायचं होतं, पण कोणीही अ‍ॅक्शन फिल्म्सची ऑफर दिली नाही. मी अनेक रोमँटिक चित्रपट केले आहेत, काही नकारात्मक भूमिका केल्या आहेत, सोशल ड्रामा चित्रपट देखील केला आहे. परंतु, कधीही अ‍ॅक्शन फिल्म केली नाही. मला नेहमीच अ‍ॅक्शनपट करायचे होते. पण, मला अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी कोणालाच साईन करायचे नव्हते, अशी मनातील खदखद त्याने व्यक्त केली आहे.

तो पुढे म्हणाला, मी मिशन इम्पॉसिबल टाईपचे चत्रपट करायला खूप उत्सुक आहे. अ‍ॅक्शनपट करायला मला थोडा उशीर झाला असला तरी मी त्याचा खूप आनंद घेत आहे. मी माझ्या या माचो लुकचा खूप आनंद घेत आहे, असेही त्याने म्हंटले आहे.

दरम्यान, 'जवान'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 75 कोटींचा हल्ला जमवत अनेक विक्रम मोडले आहेत. अनेक ठिकाणी शो हाऊसफुल झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा