मनोरंजन

जया बच्चन यांनी करिश्माला म्हटलं होतं ‘माझी होणारी सून’; पहा व्हिडीओ

अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र लग्नाआधीच या दोघांचं नातं तुटलं होते. त्यांचा साखरपुडा झाला होता. जया बच्चन यांनी एका पत्रकार परिषदेत करिश्माचा उल्लेख ‘माझी होणारी सून’ असा केला होता. माध्यमांसमोर त्यांनी करिश्मा आणि अभिषेकचं लग्न जाहीर केलं होतं.

नुकताच एक व्हडिओ व्हायरल होत आहे. यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मुलगी श्वेता नंदा पत्रकार परिषदेच उपस्थित आहेत. “बच्चन आणि नंदा कुटुंबात आम्ही आणखी एका कुटुंबाचं स्वागत करत आहोत आणि ते म्हणजे कपूर कुटुंब. रणधीर – बबिता कपूर आणि माझी होणारी सून करिश्मा कपूर. वडिलांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेकने आम्हाला दिलेली ही भेट आहे. असे जया बच्चन म्हणाल्या होत्या.

अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या या दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं.या घटनेच्या बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

Wardha Crime : शिक्षणासाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय तरुणीने नैराश्यातून जीवन संपवले

Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन

Jitendra Awhad On Ashish Shelar : आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले, "मराठी माणसाची तुलना पहलगामच्या घटनेशी.."