दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची शनिवारी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये ‘विज्ञान रत्न’सह आठ ‘विज्ञानश्री’, 14 ‘विज्ञान युवा’ आणि एक ‘विज्ञान संघ’ पुरस्काराचा समावेश आहे. पद्म पुरस्कारांच्या धरतीवर बेतलेले राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार असून पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.