Ranveer Singh Team Lokshahi
मनोरंजन

'जयेशभाई जोरदार' मधील जोरदार गाणं प्रदर्शित

चित्रपटामधील फायरक्रॅकर हे गाणं नुकतच प्रदर्शित

Published by : Akash Kukade

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आगामी चित्रपट जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील फायरक्रॅकर (Firecracker) हे गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामधील रणवीरच्या हटके अंदाजानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

'फायरक्रॅकर' हे गाणं विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांनी गायले असून कुमार आणि वायु यांनी हे गाणं लिहिले आहे. या गाण्यामधील रणवीर सिंहच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

जयेशभाई जोरदार या चित्रपटामध्ये रणबीरनं जयेशभाई ही भूमिका साकारली असून अभिनेता बोमन इराणी (Boman Irani) यांनी एका गावाच्या सरपंचाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शालिनी पांडेनं जयेशभाईच्या पत्नीची भूमिका या चित्रपटामध्ये साकारली आहे. तसेच रत्ना पाठक आणि दीक्षा जोशी हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

जयेशभाई जोरदार हा चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांक ठक्कर यांनी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा