मनोरंजन

जेठालालचा टप्पू करतोय चक्क बबिताला डेट!

Published by : Lokshahi News

बॉलिवुडमधील अनेक कलाकर डेट करतानाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही टेलिव्हीजनवरील सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकांपैकी एक आहे. त्यामुळे ही मालिका लोकांच्या मनात एख वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील जेठालाल, टप्पू, दयाबेन, बाबुजी, बबिता, अय्यर, पत्रकार पोपटलाल, सोढी, भिडे अशा अनेक पात्र प्रसिद्ध आहेत. अशातच या मालिकेमधील एक जोडी एकमेकांना डेट करत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकट आणि बबिताची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुनमुन ही राज अनाडकटपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. गेल्या वर्षभरापासून या दोघांचं प्रेमप्रकरण सुरू असल्याचं बोललं जात आहे.

नेटकऱ्यांनी टप्पू आणि बबिता डेट करत असल्यानं जेठालालवर निशाणा साधत 'साला हे दुख काये खतम नही होता बे', असं म्हटलं आहे. तर टप्पू आणि बबिताच्या संबंधावर जेठालाल म्हणतो की, साप को पाल रखा है, अशा पद्धतीचे अनेक भन्नाट मीम्स नेटकऱ्यांनी केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मीम्सची चर्चा खुपच होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द