मनोरंजन

Jhimma 2 : 'झिम्मा 2'ची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी होणार रिलीज

2021 ला आलेल्या झिम्मा सिनेमाने सर्वांची मनं जिंकली. सिनेमाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. झिम्मा सिनेमा जेव्हा संपला तेव्हा दिग्दर्शकाने झिम्मा 2 ची घोषणा केली होती.

Published by : Team Lokshahi

२०२१ ला आलेल्या झिम्मा सिनेमाने सर्वांची मनं जिंकली. सिनेमाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. झिम्मा सिनेमा जेव्हा संपला तेव्हा दिग्दर्शकाने झिम्मा 2 ची घोषणा केली होती. आता झिम्मा 2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हेमंत ढोमेने सोशल मिडीयावर पोस्ट करुन ही खास माहिती शेअर केली. त्याने लिहिलं आहे,"प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत... पण मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात. पण त्यासाठी रियुनियन महत्त्वाची आणि आपली रियुनियन होणार 24 नोव्हेंबरपासून भेटूया चित्रपटगृहात (मागच्या खेपेसारखं)".

'झिम्मा 2' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अखेर हा बहुचर्चित सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंतने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'झिम्मा 2' पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, आतुरतेने सिनेमाची प्रतीक्षा करत आहोत, आता ट्रेलर आणि गाण्यांची प्रतीक्षा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

कलर येलो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित ह्या चित्रपटात तगड्या आणि लोकप्रिय कलाकारांची फौज पुन्हा एकत्र येत आहे ज्यात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत यांचा समावेश आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा