मनोरंजन

‘जिंदगानी’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित…

Published by : Lokshahi News

कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनच्या विळख्यात अडकलेली संपुर्ण चित्रपटसृष्टी या कठीण काळात पुन्हा नव्याने जोमाने उभी राहतेय,. आता लवकरच चित्रपटगृहांचे दरवाजे आपल्यासाठी उघडणार आहेत.नवनवीन मराठी चिञपट प्रेक्षकांसाठी सज्ज झाले आहेत.सध्या मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे विषय हाताळण्यात येत आहेत.नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.

'जिंदगानी' या आगामी चित्रपटाचे पोस्टर आज सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले आहे. अभिनेते शशांक शेंडे व विनायक साळवे खेडेगावातील कठीण परिश्रम आणि संयमाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या 'प्रभाकर' आणि 'सदा' या आदिवासी व्यक्तींच्या भूमिका साकारत असून या चित्रपटात त्यांच्यासमवेत अभिनेत्री सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, अभिनेते विनायक साळवे, प्रदिप नवले, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती आढळून येणार आहेत. जिंदगानी चित्रपटाद्वारे वैष्णवी हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. चित्रपटाचे लेखन विनायक भिकाजीराव साळवे यांनी केलेले असून विजय गवंडे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. तर चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे, अमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' हा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Video Viral : माता न तू वैरिणी! चिमुकलीच्या गळ्यावर पाय, स्टीलच्या चमच्याचे चापटे; जन्मदात्या आईची पोटच्या लेकीला बेदम मारहाण

Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

Wardha Crime : शिक्षणासाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय तरुणीने नैराश्यातून जीवन संपवले

Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन