Jugjugg Jeeyo Team Lokshahi
मनोरंजन

Jugjugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

मागील महिन्यामध्ये २४ तारखेला 'जुग जुग जिओ' (Jugjugg Jeeyo) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण आता प्रेक्षकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे

Published by : shamal ghanekar

मागील महिन्यामध्ये २४ तारखेला 'जुग जुग जिओ' (Jugjugg Jeeyo) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण आता प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी येत आहे ती म्हणजे शुक्रवारी (22जुलैला) अचानक OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. Amazon Primeवर हा चित्रपट प्रदर्शित करून चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. या चित्रपटामध्ये कियारा अडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर हे मुख्य भुमिका साकारत आहेत. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची कोणतीही माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे ही बातमी प्रेक्षकांसाठी सरप्राईज आहे. याआधी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकुळ घातला होता. 'जुग जुग जिओ' हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमने अचानक प्रदर्शित करण्यामागे काय कारण आहे हे अद्यापही स्पष्ट करण्यात आले नाही.

'जुग जुग जिओ' या चित्रपटाची कथा अशी आहे की, हा चित्रपट पटियालामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाची आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन हा नीतू कपूर आणि अनिल कपूर यांचा मुलगा आहे. कियारा ही वरुण धवनच्या पत्नीची भूमिकेत दिसत आहे. दोघांचे लग्न झाल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच 'जुग जुग जिओ' या चित्रपटामध्ये मनीष पॉल आणि प्राजक्ता कोहली हे मुख्य भूमिका साकारली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा