Juhi Chawla Team Kokshahi
मनोरंजन

जुहीला 'हे' चित्रपट नाकारल्याने होतोय आजही पश्चाताप

juhiने हे चित्रपट नाकारण्यामागचे हे आहे कारण

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) ही अनेक सिनेरसिकांच्या मनामध्ये आजही घर करून आहे. तो काळ होता १९९० आणि २००० दशकातला. ज्यावेळी जुही चावला बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये होती.

अभिनेता अमीर खानसोबत (Amir Khan) जुहीने बरेच चित्रपट केलेले आहेत. आमिर खान व जुही चावला यांची जोडी त्याक्षणीची परफेक्ट (Perfect) जोडी म्हणून ओळखली जायची. जुही चावला व आमिर खान यांनी केलेले बरेच चित्रपट सुपरहिटही ठरले. जे आजही प्रेक्षकांना पहायला आवडतात. आणि प्रेक्षक ती चित्रपटं आवर्जून पाहतात देखील.

जुहीने नाकारलेल्या काही चित्रपटांचा तिला आजही पश्चाताप होतोय. आता ही चित्रपटं कोणती व ती का नाकारली. आणि तिने नाकारलेल्या दोन चित्रपटांचा नक्की फायदा कोणास झाला असे प्रश्न पडतात .

खरं तर जुही चावलास ' राजा हिंदुस्थानी ' (Raja Hindustani) या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा ही ऑफर तिने नाकारली होती. त्यास कारण म्हणजे एका दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे हा चित्रपट तिला करता आला नाही. त्यानंतर करिष्मा कपूरने (Karisma Kapoor) या चित्रपटासाठी काम केलं होतं. करिष्माला या चित्रपटासाठी ' सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवार्ड देखील मिळाला होता. त्यानंतर ' दिल तो पागल हैं ' (Dil To Pagal Hai) या चित्रपटासाठी देखील करिष्माला सहकलाकार म्हणून अवार्ड देण्यात आला होत

जुही चावलाने दुसऱ्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान व्यस्त असल्या कारणाने या चित्रपटांमध्ये काम करता आलं नसल्याचं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा