Admin
मनोरंजन

ज्युनियर एनटीआर आणि राम चरण ऑस्कर 2023 मध्ये नातू-नातू गाण्यावर परफॉर्म करणार नाहीत, जाणून घ्या कारण

आरआरआर चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आरआरआर चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण चित्रपटाच्या नातू नाटू या गाण्यावर स्टेजवर नाचणार नाहीत. खुद्द ज्युनियर एनटीआरने एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ज्युनियर एनटीआरला विचारण्यात आले की तो आणि राम चरण ऑस्कर २०२३ च्या मंचावर RRR मधील गाण्यावर परफॉर्म करणार आहेत का? यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष म्हणजे ऑस्करचा हा ९५वा भाग असेल. ज्युनियर एनटीआरने सांगितले की, एमएम कीरावानी, राहुल सिपलीगंज आणि काल भैरव या गाण्यावर परफॉर्म करतील. नाटू -नाटू गाणे आणि आरआरआर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. एसएस राजामौली यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या पुरस्कार श्रेणीसाठी नामांकित झाले आहे. अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला RRR हा पहिला भारतीय चित्रपट आहे.

ज्युनियर एनटीआरला जेव्हा या नृत्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'मला वाटत नाही की हे होत आहे. मी पण विचार करत होतो, होईल पण दुर्दैवाने सरावासाठी वेळ मिळाला नाही. यामागे हेही एक कारण आहे की आपल्याला तयारीशिवाय जगातील सर्वात मोठ्या मंचावर जायचे नाही. आम्ही खूप व्यस्त होतो. यामुळे आम्ही परफॉर्म करू असे वाटत नाही पण आमचे संगीत दिग्दर्शक नक्कीच परफॉर्म करतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा