Justin Bieber Team Lokshahi
मनोरंजन

Justin Bieber : आजाराचा सामना करणाऱ्या जस्टिन बीबरचं स्टेजवर कमबॅक

हॉलिवुड पॉपुलर सिंगर जस्टीन बीबर (Justin Bieber) जगभरात प्रसिध्द आहे. सोबतच भारतातही त्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आपल्या बेबी गाण्याने सर्वच प्रेक्षकांना वेड लावले आहे. तो जगातील प्रसिद्ध पॉप गायकांपैकी एक आहे.

Published by : Team Lokshahi

हॉलिवुड पॉपुलर सिंगर जस्टीन बीबर (Justin Bieber) जगभरात प्रसिध्द आहे. सोबतच भारतातही त्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आपल्या बेबी गाण्याने सर्वच प्रेक्षकांना वेड लावले आहे. तो जगातील प्रसिद्ध पॉप गायकांपैकी एक आहे. तो ‘रामसे हंट सिंड्रोम’(Ramsay Hunt Syndrome) या आजाराला झुंज दिल्यानंतर आता स्टेजवर कमबॅक करत आहे. जस्टिनला चेहऱ्याला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याचे सगळे शो रद्द करण्यात आले होते. आता त्याच्या जस्टिस वर्ल्‍ड टूरला (Justice world tour) सुरुवात होणार आहे. जस्टिन भारतामध्ये देखील परफॉर्म करणार आहे.

याची माहिती बीबरची पत्नी हॅली बीबरनं इंस्‍टाग्रामवर जस्टिनच्या परफॉर्मेन्सचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करुन ती म्हणाली की, तिला तिच्या पतीचा अभिमान वाटतो. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'मी एक गोष्ट सांगू शकते की, या व्यक्तीला कोणी खाली खेचू शकत नाही.' असे ती म्हणाली.

यासोबतच जस्टीननेसुद्धा त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत म्हणाला की, 'हा माझ्या कमबॅकचा पहिला दिवस आहे. येथे येऊन मला चांगलं वाटतं. अनेकांना माहिती आहे की ‘जस्टिस टूर’ही इक्‍वॅलिटीसाठी केलं जाणार आहे. हे सर्वांनासाठी आहे. तुम्ही कसे दिसता? तुमचा शेप, साइद आणि दिसण्यानं काही फरक पडत नाही. आपण सर्व एक आहोत.'

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा