Justin Bieber  Team Lokshahi
मनोरंजन

Justin Bieber भारतात करणार परफॉर्म, जाणून घ्या कार्यक्रम कधी आणि कुठे असेल

हॉलिवुड पॉपुलर सिंगर जस्टीन बीबर (Justin Bieber) जगभरात प्रसिध्द आहे

Published by : shweta walge

हॉलिवुड पॉपुलर सिंगर जस्टीन बीबर (Justin Bieber) जगभरात प्रसिध्द आहे. सोबतच जस्टीन बीबरचे भारतातही लाखो चाहते आहेत. तर त्यांच्या चाहत्यासाठी एक गुड न्युज आली आहे. जस्टीन बीबर 5 वर्षानंतर भारतामध्ये परत येत आहेत.

जस्टीन बीबर आपल्या अपकमिंग अल्बम 'जस्टिस' (Justice )च्या प्रमोशन साठी वर्ल्ड टूरवर (World Tour) निघाला आहे. यादरम्यान जस्टीन बीबर भारतामध्येही आपल्या नविन अल्बम च्या प्रमोशनसाठी येत आहे. जस्टीन बीबर दिल्लीमधील एका कॉन्सर्ट (Concert) मध्ये परफॉर्म करणार आहे. हा कॉन्सर्ट दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु स्टेडियम (Jawaharlal Nehru Stadium) मध्ये 18 ऑक्टोबरला होणार आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, जस्टीन बीबर दिल्लीत होणाऱ्या कॉन्सर्टमध्ये जवळजवळ 30 मिनटे परफॉर्म करणार आहेत. जस्टीन बीबरच्या या कॉन्सर्टची अॅडवान्स तिकीट बुकिंग लवकरच सुरु होणार आहे. तर माहितीनुसार या कार्यक्रमाची ऑनलाइन बुकींग 4 जूनपासून सुरु होणार आहे.

जस्टीन बीबर जेव्हा 2017 मध्ये भारतात आला होते तेव्हा एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये (controversy) सापडला होता. कारण लोकांनी जास्त पैसे देऊन त्याच्या कॉन्सर्टची टिकीटे खरेदी केली होती पण जस्टीन बीबरने कॉन्सर्टमध्ये गाणे गायले नसल्याचा दावा करण्यात आला होता. उलट, त्याने फक्त लिप सिंग केले होते, ज्यानंतर लोकांनी त्याची खिल्ली उडवली. यादरम्यान, जस्टीन बीबर दोन दिवस भारतात राहणार होता, पण ते एका दिवसात परत निघून गेले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा