swara bhaskar Team Lokshahi
मनोरंजन

Kaali Poster Controversy : ‘काली’ पोस्टर वादानंतर स्वरा भास्करचे ट्वीट चर्चेत

स्वराने ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवादावर भाष्य केले आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (swara bhaskar) ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीतअसते. ती नेहमीच तिचे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. अनेकदा तिला यामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. तर आता स्वरा भास्करने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे आणि चर्चेचा विषय ठरली आहे. स्वराने नुकतेच ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवादावर भाष्य केले आहे.

काही दिवसांपूर्वी ‘काली’ (Kaali) या डोक्यूमेंट्रीचं (Documentary) पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होत.‘काली’ या डोक्यूमेंट्रीच्या पोस्टरवर हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला दिसत आहे. पण ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरील या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. यावरून अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत टीका केली जात आहे.

याप्रकरणी महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी प्रतिक्रिया देत देवी कालीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता स्वरा भास्करने महुआ मोईत्राच्या समर्थनात एक ट्वीट केले आहे.

ट्वीट करत ती म्हणाली, “महुआ तुम्ही खरच खूप जबरदस्त आहात. तुमचा आवाज त्याहूनही जबरदस्त आहे.”

त्यानंतर पुढे ती म्हणाली, ‘प्रिय हिंदू, उजव्या विचारसरणीचे आणि इतर घाबरलेल्या विचारांचे लोक जर तुम्हाला हिंदू धर्माची विविधता समजत नसेल. तुम्ही त्यातील भिन्न प्रथा आणि परंपरा स्वीकारत नसाल तर तो धर्माचा अपमान नाही का? असा प्रश्नही तिने विचारला आहे.

दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी काली या माहितीपटाच्या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना, “माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे. तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी ईश्वराला व्हिस्की नैवेद्य म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी ही ईश्वरनिंदा ठरते”, असे वक्तव्य केले होते. यावरूनच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द