Kajol Team Lokshahi
मनोरंजन

Kajol : काजोलच्या धडपडण्याचं आणि पिक्चर हिट होण्याच अजब connection

एक अंधश्रद्धा अभिनेत्री काजोल बद्दल सुद्धा आहे.

Published by : shweta walge

या जगात अनेक अंधश्रद्धांचे किस्से प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारे बॉलिवूडच्या अनेक अभिनेता-अभिनेत्रीबद्दल सुध्दा अनेक अंधश्रद्धांचे किस्से प्रसिद्ध आहेत. अगदी छोट्यात छोटी गोष्ट करण्याआधी अनेकजण अंधश्रद्धांना मानतात. अशीच एक अंधश्रद्धा अभिनेत्री काजोल (Kajol) बद्दल सुद्धा आहे.

काजोल आणि तिची आई तनुजा (Tanuja) ‘कोण होणार करोडपती’च्या (Kon Honar Karodpati) स्पर्धेत सहभागी झाली. या जोडीने मराठमोळ्या अंदाजात प्रश्नउत्तरांचा हा खेळ खेळला आणि खूप धमाल सुद्धा केली. या कार्यक्रमादरम्यान काजोलने अनुभवलेले काही कीस्से सांगितले आहे.

कोण होणार करोडपती या कार्यक्रमादरम्यान सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी काजोल याना खास प्रश्न विचारला. काजोल यांच्या धडपडण्याचा आणि पिक्चर सुपरहिट होण्याचं काहीतरी खास लॉजिक आहे. काही चित्रपटाच्या सेटवर काजोल धड्पडली की तो सिनेमा हिट (Cinema hits) होणार असा एक समज निर्माण झाला होता.

काजोलने हसतहसत उत्तर देत म्हणाली,”हो अनेकद सेटवर मी पडले की पिक्चर सुपरहिट होणार असं समजलं जायचं. मी जवळपास सगळ्याच सेटवर धडपडले आहे. एकदा माय नेम इज खानच्या सेटवर मी जोरदार पडले तर सगळे टाळ्या वाजवायला लागले की आता पिक्चर हिट होईल. त्यावेळी मला असं वाटलं पिक्चर सोडा पहिले कोणीतरी मला हात द्या आणि मदत करा.”

काजोलच्या या प्रकरणावर सचिन खेडेकरसह सगळेच हसले. सोनी मराठीवर हा भाग लवकरच दाखवला जाणार असून याचे अनेक व्हिडिओ प्रसिद्ध होत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा