Kamal R Khan Team Lokshahi
मनोरंजन

कमाल आर खानने लगावला ललित मोदींना टोला...

दोघांच्या लग्नाची बातमी येताच कमालने टोमणे मारत लिहिले की....

Published by : prashantpawar1

चित्रपटसृष्टीत कमाल आर खान (Kamal R Khan) वाद निर्माण करण्यासाठी आणि न बोलता वाद घालणे या कारणासाठी प्रसिद्ध आहे. तो बॉलीवूडच्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो आणि त्यावर प्रतिक्रिया द्यायला मात्र कधीच विसरत नाही. अल्पावधीतच त्याने माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. खरं तर गुरुवारी ललित मोदींनी ट्विट करत सुष्मिताशी लग्नाची घोषणा केली आणि अभिनेत्रीला आपला बेटर हाफ असं म्हटलं. मात्र काही दिवसांआधी ती स्पष्टीकरण देताना म्हटला होता की मी स्पष्टपणे बोलतोय की लग्नही लवकरच होईल.

ही बातमी येताच कमालने टोमणे मारत लिहिले की ललित मोदी भाई तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत. भारताला लुटून तुम्ही पळून गेला आहात. सुष्मिता सेन तुम्हाला केवळ पैशासाठी डेट करतेय तर लग्न करण्यासाठी नव्हे. कारण ती श्रीमंत व्यक्तींना नेहमी डेट करते. तुम्ही कदाचित तिचे ट्विटर हँडल पाहिले नसेल म्हणूनच विचार करा तुमच्या दोघांमध्ये किती प्रेम आहे.

सुष्मिता सेन 1994 मध्ये मिस युनिव्हर्स म्हणून निवडली गेली होती. तिने 1996 मध्ये दस्तक चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले हिते. तिने बीवी नंबर 1, डू नॉट डिस्टर्ब, मैं हूं ना, मैने प्यार क्यूं किया आणि तुमको ना भूल पायेंगे आणि नो प्रॉब्लेम सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. सुष्मिता सेन तिची शेवटची वेब सीरिज आर्यामध्ये दिसली होती. जी मागील वर्षी इंटरनॅशनल एमीजमध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजमध्ये नामांकित झाली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा