महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीमुळे वादात सापडलेला कुणाल कामरा हा चांगलाच चर्चेत राहिला आहे. अलिकडेच मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली. या घटनेवर चित्रपट निर्माते हंसल मेहता यानी कुणाल कामराचे समर्थन केले आहे. यावर अभिनेत्री कंगना रनौत यानी आपली प्रतिक्रिया दिली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना कंगना रनौत म्हणाली की, "कोणाचाही अपमान करणे हे योग्य नाही. विनोदाच्या नावाखाली तुम्ही कोणाच्या तरी कामाकडे दुर्लक्ष करत आहात. एकनाथ शिंदें हे काही वर्षापूर्वी रिक्षा चालवत होते. आणि स्वत:च्या जीवावर त्यांनी खूप काही साध्य केले आहे. कुणाल कामराची पात्रता काय आहे? तो कोण आहे? विनोदाच्या नावाखाली तो कोणाची तरी खिल्ली उडवतोय हे त्याला समजत नाही आहे . तो स्वत:ला इंफ्लुएन्सर म्हणतो. तो फक्त 2 मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी आपला समाज कुठे जातोय याचा विचार करायला हवा."
पुढे कंगना म्हणाली की, "जेव्हा माझ्या घरावर बेकायदेशीर कारवाई कऱण्यात आली. तेव्हा माझी थट्टा करण्यात आली, त्यावेळेस मला कोणी पाठिंबा मिळाला नाही. मी या अपघाताचा संबध या प्रकरणाशी जोडणार नाही. कोणचाही अनादर करणे चुकीचे आहे", असे कंगना म्हणाली आहे.