बॉलीवूडची क्वीन कंगना राणौत स्टारर तेजस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. वायुसेना दिनानिमित्त या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या धमाकेदार अॅक्शन आणि थ्रिलरची झलक दिसत आहे.
तेजसमधील एक साउंडट्रॅक आणि प्रभावी व्हिज्युअल इफेक्ट्स ट्रेलर हा देशभक्तीची भावना जागृत करतो. ट्रेलरमध्ये कंगना एअरफोर्सच्या धाडसी पायलटच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची दमदार कारवाई दाखवण्यात आली आहे.
कंगना राणौतच्या तेजस चित्रपटाची निर्मिती आरएसव्हीपीने केली आहे. सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित, हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. कंगना राणौतचा हा चित्रपट 2023 मध्ये 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.