Kangana Ranaut Lokshahi Team
मनोरंजन

योगी आदित्यनाथ यांची भेटीनंतर कंगना म्हणाली...

वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट'साठी कंगनाची निवड

Published by : prashantpawar1

बॉलीवुड(bollywood) अभिनेत्री कंगना राणावत(kangana ranaut) हिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi adityanath)यांची भेट घेतली होती. कंगना उत्तर प्रदेशच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अर्थात ODOP ह्या योजनेची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. या योजनेसंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी अभिनेत्री कंगनाने योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर आज महाराज योगी यांच्या समवेत माझी भेट झाली याचा मला अतिशय आनंद होतोय. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला योगी यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा करता आली, असं देखील तिने यावेळी सांगितलं होतं.

७ ऑक्टोंबर रोजी कंगनाची भेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोबत झाली होती. त्यावेळी या भेटीदरम्यान 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट'(ODOP) या योजनेसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश हा काही विशिष्ठ उत्पादनांना पुढे घेऊन जाण्यासाठी मदत म्हणून काम करते. कंगनाचा आगामी चित्रपट 'धाकड' हा 20 में रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बऱ्याच प्रमाणात चर्चा होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."