Admin
मनोरंजन

Emergency first look: कंगना रणौतने शेअर केला Emergencyचा फर्स्ट लूक, इंदिरा गांधींसारखी दिसते का?

कंगना रणौतचा चित्रपट इमर्जन्सीचा फर्स्ट लूक बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यूट्यूबवर 1.21 सेकंदाच्या फर्स्ट लूकमध्ये कंगना रणौत इंदिरा गांधींच्या गेटअपमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे. सोशल मीडियावर या लूकचे खूप कौतुक होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कंगना रणौतचा चित्रपट इमर्जन्सीचा फर्स्ट (Emergency) लूक बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यूट्यूबवर 1.21 सेकंदाच्या फर्स्ट लूकमध्ये कंगना रणौत इंदिरा गांधींच्या गेटअपमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे. सोशल मीडियावर या लूकचे खूप कौतुक होत आहे.

हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार असून चित्रपट हा राजकीय नाटक आहे. यामध्ये कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. चित्रपटात इमर्जन्सीचा (Emergency) काळ दाखवण्यात आला आहे. 'धाकड' चित्रपट फ्लॉप होताच कंगनाने या चित्रपटाची तयारी सुरू केली.

टीझरची सुरुवात फोन कॉलने होते. कंगना मागून दाखवली आहे. एका व्यक्तीने कंगनाला विचारले, जेव्हा प्रेसिडेंट निक्सन फोन लाइनवर येतात तेव्हा ते तुम्हाला मॅडम म्हणून संबोधू शकतात का? यावर कंगना उत्तर देते, ठीक आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एक मिनिटासाठी सांगा की माझ्या ऑफिसमधील प्रत्येकाला सर म्हणतात, मॅडम नाही. कंगनाच्या या लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. कंगनाने सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल अनेकदा लिखाण केले आहे. तिने लिहिले की, मी एक वर्षापासून यावर काम करत आहे. आता असे वाटते की या चित्रपटासाठी माझ्यापेक्षा चांगला दिग्दर्शक कोणीच असू शकत नाही.

कंगनाने इमर्जन्सी (Emergency) या चित्रपटाच्या लूक टेस्टचा फोटो शेअर केला तेव्हा त्याची फोटीची खिल्ली उडवण्यात आली. कंगना राणौत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. मणिकर्णिका नंतर तिच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा दुसरा चित्रपट आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा