Kangana Ranaut Lokshahi Team
मनोरंजन

अजय अन् अक्षयबद्दल कंगना बोलली असं काही की...

एका मुलाखती दरम्यान कंगना अजय आणि अक्षय बद्दल बोलली

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत(Kangana Ranaut) काही ना काही विषयांवर सतत चर्चेत असते. कंगना सध्या तिच्या 'धाकड' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कंगणाचा 'धाकड' हा चित्रपट 20 मे रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान कंगनाने बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कंगनाला विचारण्यात आलं होतं की इंडस्ट्रीतील प्रत्येकजण एकमेकांना खरोखर सपोर्ट करतो का? यावर कंगनाचे उत्तर हे आश्चर्यचकित करणारेच होते. अजय देवगण (अजय देवगण) यांच नाव घेत कंगना म्हणाली की अजय देवगण हे माझ्या चित्रपटाचे प्रमोशन कधीच करणार नाहीत. ते इतर चित्रपटांचे प्रमोशन करतील पण माझ्या चित्रपटाचं करणार नाहीत. याचबरोबर अक्षय कुमार यांच्याबद्दल बोलताना कंगना म्हणाली की, "अक्षय कुमारने मला फोन केला आणि शांतपणे सांगितले की, मला तुझा 'थलायवी' चित्रपट खूप आवडला. त्यांना माझा चित्रपट आवडला परंतु त्यांनी माझ्या चित्रपटाचा ट्रेलर मात्र ट्विट केला नाही असं देखील तिने सांगितलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश

AsiaCup 2025 : BCCI च्या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ,शुभमन गिल उपकर्णधार