Kangana Ranaut, Vivek Agnihotri, Eknath Shinde Team Lokshahi
मनोरंजन

Kangana-Vivek Agnihotri: एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॉलिवूड कलाकार आले पुढे

राज्यातील सर्वात बलाढ्य पक्ष समजल्या जाणाऱ्या शिवसेनेतआता दोन गट पडले आहेत.

Published by : shweta walge

देशाच्या राजकारणात दिवसेंदिवस बदल होत आहेत. राज्यातील सर्वात बलाढ्य पक्ष समजल्या जाणाऱ्या शिवसेनेत (Shivsena) आता दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असे लोकांना वाटत होते, पण उलट महाराष्ट्राची धुरा आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शिंदे यांच्यावर सातत्याने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता या अभिनंदन पत्रांमध्ये दोन प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींच्या (Bollywood celebrities) नावाचाही समावेश करण्यात आला आहे. हे दोघे दुसरे तिसरे कोणी नसून कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेकअग्निहोत्री (Vivek Agnihotri) आहेत. दोन्ही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.

कंगना रनौत

उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर कंगनाने एक व्हिडीओही शेअर केला होता, ज्यामध्ये तिने उद्धव यांचा अभिमान मोडल्याबद्दल बोलले आहे. सोशल मीडियावर उद्धव यांना शिव्या दिल्यानंतर आता कंगनाने एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर करत कंगनाने एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक केले. अभिनेत्रीने लिहिले, 'त्याची यशोगाथा किती प्रेरणादायी आहे... ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शक्तिशाली व्यक्तींपैकी एक बनण्यापर्यंत... अभिनंदन सर.'

विवेक

'द काश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आणि आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले आणि लिहिले, 'एकनाथ शिंदे तुमचे अभिनंदन आणि गतिमान नेतृत्वासाठी देवेंद्र फडणवीस तुमचेही अभिनंदन. अखेर, आता आपण न घाबरता जगू शकू. जय महाराष्ट्र.'

हे सेलिब्रिटी भारतीय जनता पक्षाचे समर्थक

कंगना आणि विवेक यांनी भाजपच्या समर्थनार्थ आवाज उठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही हे दोन्ही स्टार्स उघडपणे पक्षाला पाठिंबा देताना दिसले आहेत. यावेळीही तसेच झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्यानंतर बहुमताअभावी उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. परिणामी, राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) नवीन सत्ताधारी पक्ष म्हणून घोषित केले. एवढेच नाही तर भाजपने आपल्या मनमिळाऊ रणनीतीने देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज