Kapil Sharma 
मनोरंजन

Kapil Sharma : कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर पुन्हा गोळीबार

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडा येथील ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे.

Published by : Team Lokshahi

(Kapil Sharma) प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडा येथील ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून, ही महिनाभरातली दुसरी वेळ आहे. ब्रिटिश कोलंबियातील सरे शहरात 85 Avenue आणि Scott Road च्या चौकात असलेल्या या कॅफेवर गुरुवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये कॅफेच्या खिडक्यांचे व भिंतींचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. हल्ल्यावेळी काही कर्मचारी कॅफेमध्ये उपस्थित होते, या घटनेनं भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगमधील एका सदस्याकडून सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. गेल्या महिन्याभरातली गोळीबाराची दुसरी घटना आहे. याआधी 10 जुलै रोजी याच कॅफेवर गोळीबार झाला होता. त्यानंतर काही दिवस कॅफे बंद ठेवावा लागला. 20 जुलै रोजी कपिलने इंस्टाग्रामवरून कॅफे पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली होती.सलग दोन हल्ल्यांमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. कॅनेडियन पोलिसांनी कॅफे परिसरातील सुरक्षा वाढवली असून, फेडरल तपास संस्थाही या प्रकरणात सहभागी झाल्या आहेत. तपासात सोशल मीडिया पोस्ट, सीसीटीव्ही फूटेज यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.

स्थानिक समुदाय आणि कपिलचे चाहते या घटनांमुळे चिंतेत आहेत. काहींनी सोशल मीडियावरून त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना व्यक्त केली, कपिल शर्माने अद्याप या घटनेवर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Solapur : सोलापुरात विजेचा धक्का लागून शेतकरी व मजुराचा मृत्यू; दोन जणांचा थोडक्यात जीव वाचला

Prajakta Gaikwad Engagement : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न, फोटो आले समोर

Ajit Pawar : '...बिल घेऊ नका' चाकण दौऱ्यावर असताना अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

Latest Marathi News Update live : चाकणमध्ये अजित पवार यांच्याकडून वाहतूक कोंडीचा आढावा