Karan & Tejaswi Team Lokshahi
मनोरंजन

Karan-Tejasswi : करण आणि तेजस्वीचा रोमॅंटिक व्हिडिओ होतोय व्हायरल

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिला तर तेजरणची ही जोडी एकमेकांच्या प्रेमात बुडलेली दिसत आहे.

Published by : Team Lokshahi

टीव्ही अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) यांची जोडी बिग बॉस ओटीटी या सुप्रसिद्ध शोपासून बनली होती. या शोपासून करण आणि तेजस्वी एकमेकांसोबत फिरताना नेहमीच दिसतात. साहजिकच या दोघांमध्ये अनेक प्रसंगी अपार प्रेम पाहायला मिळतं. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अधिक प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे लव्ह बर्ड लिपलॉक करताना दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील सुपरस्टार करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश सतत काही ना काही विषयावर चर्चेचा विषय बनतात. अनेकदा हे जोडपं पापाराझींसमोरही आपली उपस्थिती लावतं. दरम्यान करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिला तर तेजरणची ही जोडी एकमेकांच्या प्रेमात बुडलेली दिसणार आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये करण आणि तेजस्वी एकमेकांना लिपलॉक करत आहेत. त्यानंतर अचानक तेजस्वी प्रकाशचा मित्र त्या दोघांचा व्हिडिओ बनवतो. हे पाहून अभिनेत्री घाबरते आणि तिच्या मित्राला ते बंद करण्यास सांगते. पण तो व्हिडिओ पाहून करण खूप खूश आहे. मात्र यानंतर या सुंदर व्हिडिओसाठी तेजस्वीने तिच्या मित्राचे आभार मानले.

तेजरणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या रोमँटिक क्षणाचा हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे. तेजरनचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतोय. करण (करण कुंद्रा) आणि तेजस्वी यांच्यात किती प्रेम आहे याचा अंदाज या व्हिडिओद्वारे तुम्ही सहज लावू शकता. इश्कमधील हे दोन जोडपे एकमेकांसाठी किती वेडे आहेत याचा पुरावा म्हणजेच हा क्यूट व्हिडिओ आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका