मनोरंजन

करण जोहरने केली आलिया भटच्या 'जिगरा' या नवीन सिनेमाची घोषणा

आलिया भट सध्या करिअरच्या शिखरावर आहे. गंगूबाई काठियावाडी, ब्रम्हास्त्र, रॉकी और रानी की प्रेम कहानी अशा अनेक सिनेमांंमधून आलिया भटने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

Published by : Team Lokshahi

आलिया भट सध्या करिअरच्या शिखरावर आहे. गंगूबाई काठियावाडी, ब्रम्हास्त्र, रॉकी और रानी की प्रेम कहानी अशा अनेक सिनेमांंमधून आलिया भटने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. आलियाचे सर्वच सिनेमे बॉक्स ऑफीसवर सुपरहिट होत आहेत.

आलिया भट्टने आता तिच्या 'जिगरा' या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' नंतर अभिनेत्री करण जोहरसोबत नव्या प्रोजेक्टसाठी पुन्हा हातमिळवणी करत आहे. ती धर्मा प्रॉडक्शनसोबत 'जिगरा'ची सहनिर्मिती करणार आहे. याचे दिग्दर्शन वासन बाला करणार आहेत. आलियाने आज, 26 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर घोषणा व्हिडिओ शेअर केला आहे. 'जिगरा' 27 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.

सुरुवातीला स्क्रीनवर एक कोट दिसतो. या कोटमध्ये, "धैर्याचा विरोधाभास असा आहे की ते टिकवून ठेवण्यासाठी एखाद्याने जीवनाबद्दल थोडेसे निष्काळजी असणे आवश्यक आहे." व्हिडिओ नंतर आलिया तिच्या खांद्यावर बॅग दाखवत आहे. ती एकटीच रस्त्यावर उभी असलेली दिसते.

व्हिडिओ शेअर करताना, आलिया भट्टने कॅप्शनमध्ये लिहिले की, "अत्यंत प्रतिभावान @vasanbala द्वारे दिग्दर्शित आणि @dharmamovies आणि @eternalsunshineproduction द्वारे निर्मित #Jigra सादर करत आहे. धर्मा प्रॉडक्शनमध्ये पदार्पण करण्यापासून ते आता त्यांच्यासोबत एका चित्रपटाची निर्मिती करण्यापर्यंत, अनेक प्रकारे, मी जिथून सुरुवात केली तिथून पूर्ण वर्तुळात आल्यासारखं वाटतं. प्रत्येक दिवस हा एक वेगळा दिवस असतो - रोमांचक, आव्हानात्मक (आणि थोडा धडकी भरवणारा) - फक्त एक अभिनेता म्हणून नाही तर एक निर्माता म्हणून देखील आपण या चित्रपटाला जिवंत करतो आणि आम्ही पुढे जात असताना मी अधिक सामायिक करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. जिगरा - 27 सप्टेंबर 2024 (sic) रोजी सिनेमागृहात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर