मनोरंजन

करण जोहरने आगामी चित्रपटात लॉच केले “हे”तीन नवीन चेहरे

Published by : Team Lokshahi

चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) आगामी चित्रपटात तीन नवीन चेहरे लॉच केले आहेत. ह्यात पहीले नाव म्हणजे लक्ष्य लालवाणीचे (Lakshya Lalvani) आहे. तर संजय आणि महीप कपूरची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) आणि गुरफतेह पीरजादा (Gurfateh Peerzada) देखील या चित्रपटाव्दारे बॉलिवूड Bollywood मध्ये पर्दापण करणार आहेत. "बेधडक" (Bedhadak) या आगामी चित्रपटा मध्ये हे तिघही अभिनय करणार आहेत. तसेच शशांक खेतान (Shashank Khaitan) यांनी हे चित्रपट निर्देशित केले आहे. ही बातमी शेअर करत करण जोहर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.


करण जोहरने पोस्टर शेअर लिहिले की, "

अंदाज आहे की हे तुमच्या हृदयात तितक्याच सहजतेने विरघळेल जितक्या सहजतेने त्यांचे हसु आहे. सादर करत आहोत करणची भूमिका करणारा 'लक्ष्य भावनांचा उस्ताद, असे ट्विट करत त्याने त्यांची ओळख सांगितली. तर  या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान (Directing) करणार आहेत". तर शनायासाठी करण लिहीतो "बेधडकमध्ये निमृतची भूमिका करणाऱ्या सुंदर शनाया कपूर". शनाया कपूर पडद्यावर तिची जादू कशी निर्माण करते हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक असल्याचेही करण जोहर म्हणाला.


गुरफतेह पिरजादाचा परिचय देताना, करण जोहर लिहिले "त्याची आवडती शैली तुम्हाला चकित करेल.  गुरफतेह पिरजादा बेधडक मध्ये अंगदचे पात्र जिवंत करेल. तसेत लक्ष्य लालवाणी एक टेलिव्हिजन अभिनेता आहे ज्याने चित्रपटांच्या जगात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...