मनोरंजन

करण जोहर तयार करणार जालियनवाला बाग हत्याकांडावरील सिनेमा

Published by : Lokshahi News

करण जोहरने आपल्या पुढच्या सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा स्वातंत्र्यचळवळीच्या काळात घडलेल्या कुख्यात जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित असणार आहे. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार आहे, तर करण सिंग त्यागी डायरेक्‍शन करणार आहे. सध्यातरी करण जोहरने या सिनेमाबद्दल एवढीच माहिती दिली आहे. अजून सिनेमाची कथा पूर्ण लिहूनदेखील झालेली नाही. या हत्याकांडानंतर झालेल्या खटल्याचा तपशील यामध्ये असणार आहे.

शंकरन नायर यांनी याप्रकरणी ब्रिटिश साम्राज्याविरोधात खटला चालवला होता. या प्रकरणामागील सत्य उजेडात आणून त्यांनी देशभर स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा वणवा भडकावला होता. अनेक सत्य घटनांचे संदर्भ त्यासाठी देण्यात आले आहेत. शंकरन नायर यांचे पणतू रघू पलत आणि त्यांच्या पत्नी पुष्पा पलत यांनी लिहिलेल्या 'द केस दॅट शूक द एम्पायर' या पुस्तकाच्या आधारे या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे, असे प्रॉडक्‍शन हाऊसने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा